
अमळनेर:- तालुक्यातील पाडसे येथे भरधाव वेगाने जाणारा वंडर सिमेंट कंपनीचा कंटेनर रस्त्यालगतच्या घरात घुसल्याची घटना दिनांक १५ रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास घडली आहे.

दिनांक १५ रोजी सकाळी बेटावदकडून अमळनेर कडे भरधाव वेगाने जाणारा एमएच १९ सीवाय ७०८२ क्रमांकाचा वंडर सिमेंट कंपनीचा कंटेनर पाडसे गावाजवळ रस्त्याला लागून असलेल्या घरात घुसला. ही धडक इतकी जोरदार होती की, एक रूम पूर्णपणे जमीनदोस्त झाला आहे. सदर घरमालक गावातच दुसऱ्या घरात राहत असल्याने घरात कोणी नव्हते त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र जमीनदोस्त झालेल्या रुममध्ये शेती अवजारे, टेबल खुर्चीसह लोखंडी बाक व इतर साहित्य पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. सदर चालकाविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ शरीफ पठाण हे करीत आहेत. दरम्यान सदर कंटेनरचा चालक जखमी झाल्याने पोलिसांनी त्याला ग्रामस्थांच्या मदतीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. व पुढील उपचारासाठी त्याला जळगाव येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.




