अमळनेर:- शहरातील मध्यवर्ती भागात कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. निखिल पाटील व डॉ. विद्या पाटील अमळनेरकरांच्या सेवेत दाखल होणार असून शुभारंभानिमित्त सत्यनारायणाच्या महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील शिव पेट्रोल पंपासमोरील डॉ. रा. का. पाटील यांच्या जुन्या दवाखान्यात कृष्णा हॉस्पिटलचा आज दिनांक १७ सप्टेंबर रोजी शुभारंभ होणार असून जनरल सर्जन डॉ. निखिल एस. पाटील व फॅमिली फिजिशियन डॉ. विद्या पाटील हे तालुका वासियांच्या सेवेत रुजू होणार आहेत. डॉ. पाटील यांचे वडील शिक्षक सुधाकर कृष्णा पाटील व आई सरला पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दुर्बिणीद्वारे व ओपन ऑपरेशनची सुविधा तालुक्यात उपलब्ध होणार आहे. यावेळी विविध वैद्यकीय संघटनांचे पदाधिकारी, डॉक्टर्ससह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या शुभारंभ व तिर्थप्रसादास उपस्थिती द्यावी अशी विनंती डॉ. निखिल पाटील व डॉ. विद्या पाटील यांच्यासह समस्त सारबेटेकर परिवाराने केली आहे.