तहसीलदारांनी सावखेडा निमगव्हाण पुलावर भेट देत केली पाहणी…
अमळनेर:- गेल्या दोन तीन दिवसापासुन तापी नदीच्या उगमस्थानावर सुरु असलेल्या संततधार पावसामुळे हतनुर धरणाचे सर्व दरवाजे उघडले असून तापी नदीने उग्र रूप धारण केले आहे.
सावखेडा येथे काल दुपारी ४ वाजेला पाण्याची लेव्हल पातळी ५ मिटर होती, रात्री ती १२ मिटरने वाढली आहे. रात्री १ वाजेनंतर पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे, असे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व तलाठी सतिष शिंदे यांनी सांगितले. सावखेडा – निमगव्हाण तापीपुलावर त्यांनी रात्री ११ वाजता येऊन प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली असता सुचना केल्या. त्यावेळी पोलिस पाटील भरत निकम, पत्रकार भानुदास पाटील उपस्थित होते.