
सन २०२३-२४ साठी नूतन कार्यकारिणीची निवड केली घोषित…
अमळनेर:- येथील लाड शाखीय वाणी पंच मंडळाच्या अध्यक्षपदी सुनिल पांडुरंग वाणी यांची बिनविरोध निवड मंडळांच्या बैठकीत करण्यात आली,यावेळी सन २०२३-२४ साठी संपुर्ण कार्यकारणी घोषित करण्यात आली.

लाडशाखीय वाणी पंच मंडळाची मागील वर्षी त्रैवर्षीक निवडणुक झाली होती. त्यावेळी दरवर्षी नवीन अध्यक्ष दिला जाईल असे सर्वानुमते ठरविण्यात आले होते. त्यानुसार गेल्या वर्षी निवड झालेले अध्यक्ष विनोद कोठावदे यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन सन २०२३/२४ साठी पुढील कार्यकारिणी जाहीर केली. यावेळी अध्यक्षपदी सुनील पांडुरंग वाणी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष म्हणून वनिता मंगेश महिंद, सेक्रेटरी संजय दत्तात्रय भामरे, सहसेक्रेटरी मंगला अशोक वाणी (शिरोडे), खजिनदार म्हणून नितीन मुरलीधर भदाणे, तर सदस्य जितेंद्र हरी राणे, विनोद प्रभाकर कोठावदे, योगेश दत्तात्रय येवले, पंकज काशिनाथ मराठे, प्रकाश काशिनाथ अमृतकार, सुनील चंद्रकांत भामरे यांची निवड करण्यात आली.सदर निवड होताच गणेश पांडुरंग वाणी, सतीश काशिनाथ मराठे, राजेंद्र फकीरा वाणी, विजय पांडुरंग वाणी, योगेश महाजन, नितीन राणे, सुंदर पट्टीचे सुरेश पाटील, मंगेश महिंद, संदीप शिरोळे, महेश सोंजे, दिलीप येवेल यांनी नवीन कार्यकारिणीने समाज उपयोगी कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करून नवीन कार्यकारणीचे अभिनंदन केले.




