मालकाच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद…
अमळनेर:- तालुक्यातील मुडी प्र. डांगरी येथील शेडमधून ४५ हजार रुपयांची ट्रॅक्टरची ट्रॉली अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना १६ रोजी रात्री घडली आहे.
मुडी प्र. डांगरी येथील शेतकरी राजेंद्र शामराव वानखेडे यांनी १६ रोजी त्यांची ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक एम एच १९ ए एन ५४०६ ही शेडमध्ये लावून ते घरी गेले. दिनांक १७ रोजी सकाळी सालदार सुनील भिल याला ट्रॉली चोरीस गेल्याचे निदर्शनास आल्याने त्याने राजेंद्र वानखेडे यांना कळविले. मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पो कॉ भरत गायकवाड करीत आहे.