घाणीमुळे परिसरात वाढला डासांचा प्रादुर्भाव, ग्रामस्थ झाले त्रस्त…
अमळनेर:- तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे येथील आदिवासी वस्तीत येथील रहिवाशांनी उघड्या गटारी व नाल्याची तक्रार केली. परंतु, आत्ताच तर काम झाल्याचे फोनवरती बोलून अधिकारी मोकळे झाले आहेत. आधीच नाल्याच्या पाण्याचा त्रास आणि डासांमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्या नागरिकांना सहन कराव्या लागत आहे.
पिंपळे मधून शिरसाळेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूने असलेल्या गटारावर झाकण नाही. अनेकदा त्यातील घाण पाणी बाजूच्या घरांमध्ये शिरते. घाणीमुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे परिसरात अनेक नागरिक आजारी पडल्याचे स्थानिकांनी सांगितले. सण-उत्सवामध्ये रात्रीचे पथदिवे बंद असल्या कारणाने परिसरात अंधारामुळे लहान मुलांना व वयोवृद्ध व्यक्तींना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामूळे लवकरात लवकर या समस्या सोडवाव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.