जिल्हा किसान काँग्रेसने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी…
अमळनेर:- तापी, पूर्णा नद्यांच्या पुरामुळे अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात यावा आणि सरदार खतामुळे झालेली नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जळगाव जिल्हा किसान काँग्रेसने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिनांक १७ व १८ सप्टेंबरला तापी व पूर्णा नद्यांना पूर आल्याने अमळनेर तालुक्यातील तापी नदी काठावरील अनेक शेतकऱ्यांची कापूस, ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच सुपर दाणेदार सरदार खतामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची पिके कोमेजून उत्पन्न हातचे गेले होते. त्यामुळे पुराच्या नुकसानीचा पंचनामा करून मदत मिळावी तर खतामुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला खत कंपनीकडून मिळवून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेस उपाध्यक्ष योगेंद्र पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा सुभाष पाटील, डॉ अनिल शिंदे,धनगर पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी प्रसाद यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.