
आमदार पडळकराच्या प्रतिमेला जोडे मारून केले निषेध आंदोलन…
अमळनेर:- भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (अजित पवार गट) बुधवारी २० रोजी महाराणा प्रताप चौकात आमदार पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून आ.गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी तालुका कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, विधानसभा क्षेत्र प्रमुख भागवत पाटील, महिला तालुकाध्यक्षा प्रा.मंदाकिनी भामरे, शहराध्यक्षा अलका पवार, माजी तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे, प्रवीण पाटील,राजेंद्र देशमुख, पिंटू राजपूत, अनिल शिसोदे, सुनिल शिंपी, देविदास देसले, बाळू पाटील, निनाद शिसोदे, अभिजित ढमाळ, इम्रान खाटीक, उमाकांत साळुंखे, रनछोड पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

