
अमळनेर:- राष्ट्रीय ओपन कराटे स्पर्धा भुसावळ, येथे सेल्फ डिफेन्स स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया शांतोकोण कराटे असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे दिनांक १० सप्टेंबर २३ रोजी घेण्यात आलेल्या यात विविध भागातून मोठ्या प्रमाणात खेळाडूंनी सहभाग नोंदविला.

अमळनेर येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले. राष्ट्रीय कराटे स्पर्धेत विजयी झालेले खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे आरुष विनोद अमृतकर (सुवर्ण व कांस्यपदक), प्रियम प्रशांत शिंदे ,सुवर्ण व रौप्य), आर्या राजेंद्र देशमुख (सुवर्ण व कांस्यपदक), हिंदवी विजय निकम (दोन रौप्य पदक) खेळाडूंनी कुमिती फाईट व कांता या दोन स्पर्धेत सहभाग घेतला होता. यावेळी क्रीडा शिक्षक सुनील करंदीकर व योगेश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे चेअरमन नीरज अग्रवाल, मुख्याध्यापक हेमंत कुमार देवरे, उपमुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.




