तालुक्यातील सात गावांमध्ये एक गाव एक गणपतीची झाली स्थापना…
अमळनेर:- शहरासह तालुक्यात लाडक्या गणरायाचे ढोल ताशांच्या गजरात आगमन झाले असून सार्वजनिक मंडळांनी मोठया वाहनात गणपतीची मूर्ती नेली. तर गणरायाची मूर्ती खरेदी वेळी कुटुंबीयांसह चिमुकल्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी बाजारात झाली होती.
अमळनेर पोलिस ठाणे अंतर्गत १७२ तर मारवड अंतर्गत ३७ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना झाली असून तर सात गावांमध्ये एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. गणरायाची पाचव्या, सातव्या आणि अनंत चतुर्थीला विसर्जन करण्यात येणार असून पाचव्या दिवशी ७, सहाव्या दिवशी १, सातव्या दिवशी १२, आठव्या दिवशी १६, तर नवव्या दिवशी ५० आणि शेवटच्या अनंत चतुर्थीला ७२ गणेश मंडळांचे विसर्जन केले जाणार आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल नंदवाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे , सपोनि शीतलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी व होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात आले आहेत.