
साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजन…
अमळनेर:- तालुक्यातील जानवे येथील साने गुरुजी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या यशवंतांचा गौरव करण्यात आला.

सदर कार्यक्रमात सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफ, एमएसएफ अशा विविध पदांवर निवड झालेल्या नऊ जवानांचा व टॅक्स असिस्टंट पदावर कुमारी दामिनी हिची निवड झाल्याबद्दल सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अमळनेर येथील मोफत स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक विजयसिंह पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त पीएसआय नरसिंग वाघ तसेच जानवे गावाचे सरपंच वकील बाबा, उपसरपंच गोपाल पाटील, माजी सरपंच शिवाजी जुलाल पाटील, नवल आनंदा पाटील गावाचे प्रतिष्ठीत नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष डी एम पाटील यांनी केले. निवड झालेल्या जवानांचा सन्मानचिन्ह व वाचनीय पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृष्णा रामदास पाटील, अनिल मधुकर पाटील, शरद शेनपडू पाटील, बाळू पेंटर, वाचनालयाचे कर्मचारी एकनाथ बोरसे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल विजय पाटील यांनी केले.




