
अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे गावाजवळ तांदळी रस्त्यावर वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर तलाठ्यांनी पकडले असून मारवड पोलिस ठाण्यात जमा केले आहे.

काल दि. २५ रोजी सकाळी ७:३० वाजता कळमसरे येथील तांदळी रस्त्यावर जि. प. शाळा जवळ अनधिकृत रेती वाहतूक करणारे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर आढळल्याने ते पकडण्यात आले. पुढील कारवाईसाठी सदर ट्रॅक्टर मुद्देमालासह मारवड पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. पथकात मंडळ अधिकारी सुरेश आर बोरसे, तलाठी जितेंद्र जोगी, तलाठी मनोहर भावसार, तलाठी विकास परदेशी, कोतवाल वासुदेव तिरमले, कोतवाल आधार सोनवणे हे होते.




