सैंदाणे यांना डांगरी येथे तात्काळ चार्ज घेण्याचे माध्य. शिक्षणाधिकारींचे आदेश…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील ग्रामविकास शिक्षण मंडळाच्या सु.हि. मुंदडे हायस्कूल व द्रो. फ. साळुंखे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापक पदाचा चार्ज नितिन सनेर यांना देण्याचे लेखी आदेश माध्य. शिक्षणाधिकारी यांनी नुकतेच दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारींनी सेवाजेष्ठ असून सुद्धा मुख्याध्यापक म्हणून मान्यता नाकारल्याचा आरोप शिक्षक नितीनकुमार प्रभाकर सनेर यांनी पत्रकार परिषदेत केला होता. संस्थेत दोन कार्यकारिणी असल्याने दुसऱ्या कार्यकारिणीने त्यांचा मुख्याध्यापक पदाचा प्रस्ताव पाठवला असता शिक्षणाधिकारींनी तीन दिवसात तीन निर्णय देऊन अखेरीस मान्यता नाकारली होती. त्यामुळे त्यांना नियमाप्रमाणे मान्यता देण्यात यावी अशी मागणी सनेर यांनी केली होती व यासंदर्भात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला होता. त्यानतंर दिनांक ६ ऑक्टोबर रोजी या वादात माध्यमिक शिक्षणाधिकारी परदेशी यांनी लेखी आदेश देत सनेर यांची मारवड येथे प्रभारी मुख्याध्यापक पदी नियुक्ती केली असून आधी कार्यरत असलेले लक्ष्मीकांत सैंदाणे यांना परत डांगरी येथे तात्काळ चार्ज घेण्याचे आदेश दिले आहेत.




