अमळनेर:- स्व.किशोरकुमार यांच्या पुण्यतिथी निमित्त अमळनेर येथील श्री सुनिल वाघ प्रस्तुत सूर-संगम म्युझिकल ग्रुपतर्फे “यादो का मेला” कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दि 13 ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम मराठा मंगल कार्यालय,भगवा चौक, अमळनेर येथे सायंकाळी ६:३० वाजता होणार असून यावेळी उदघाटक म्हणून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे. सदर कार्यक्रम विनामूल्य आहे.तरी रसिक श्रोत्यांनी यावेळी उपस्थिती देऊन स्व किशोरकुमार यांच्या अजरामर सुरेल गीतांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.