अमळनेर:- तालुक्यातील धानोरा-भोरटेक ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनंदाबाई शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
काल दिनांक १३ रोजी धानोरा भोरटेक ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सरपंच निवड संपन्न असून सरपंच पदी सुनंदाबाई गुलाबराव शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी गिरासे, तलाठी पिंटू चव्हाण, ग्रामसेवक भोई यांनी काम पाहिले. तसेच यावेळी उपसरपंच पुर्वा गिरासे, माजी सरपंच विजुबाई ठाकरे, सदस्य गोपीचंद ठाकरे, अशोक ईडांईस, सुनिल भिल, ठगुबाई भिल, माजी उपसरपंच दिलीप ठाकरे, शांताराम ठाकरे, छबीलाल ठाकरे, अमोल गिरासे, गुलाबराव शिंदे, शरद शिंदे,नाना भिल पोलीस पाटील तुकाराम ठाकरे, हेमकांत शिंदे, चेतन शिंदे, महेश शिंदे उपस्थित होते.