
अमळनेर:- शहरातील साने गुरुजी विद्या मंदिर शाळेचे उपशिक्षक मदनलाल मूलचंद जैन 34 वर्ष सेवा करून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत.

या ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेच्या काळात त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. द्वितीय भाषा हिंदी सारखा विषय त्यांनी विद्यार्थ्यांना सोपा करून शिकवला,तसेच आपल्या विनोदी स्वभावाने स्टाफ मधील लहान मोठ्या प्रत्येक सहकार्याला आपलेसे करण्याची कला त्यांना अवगत होती. त्यामुळेच शाळेतील प्रत्येकाला सेवानिवृत्ती नंतर ही त्याची उणीव शाळेत जाणवणार असल्याचे मनोगत सहकारी शिक्षकांनी व्यक्त केले.शहरातील भांडारकर कंपाउंड येथे जैन परिवार गेल्या दोन दशकापासून वास्तव्यास असून त्यांचे दोन्ही मुले निलेश आणि जयेश उच्च विद्याभूषित आहेत.वयाने सेवानिवृत्त झाले असले तरी मदनलाल जैन हे हुन्नरी व्यक्तिमत्त्व आहे, स्वतःला व्यस्त ठेवतील यात शंका नाही त्यांचे पुढील आयुष्य सुखी समाधानाचे जावो अशी सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली.




