१७१ जोडपी झालीत सहभागी, न्यू प्लॉट परिसर विकास मंचचा स्तुत्य धार्मिक उपक्रम…
अमळनेर:- येथील न्यू प्लॉट परिसर विकास मंच नवरात्रोत्सव मंडळाने अष्टमी निमित्त आदिशक्तीची भव्य महाआरती आयोजित करून सर्व समाजाच्या प्रतिनिधींच्या सहभागाने सामाजिक एकात्मतेचा जागर घडवून आणला.
प्रचंड विलोभनीय आणि श्रद्धापूर्वक ही महाआरती झाल्याने याची विशेष चर्चा संपुर्ण शहरभर झाली.सदर महा आरतीला मुख्य यजमान म्हणून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल भाईदास पाटील हे मुख्य यजमान म्हणून उपस्थित होते तर त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक विजय शिंदे,तसेच सामाजिक एकात्मता म्हणून बोहरी समाज, शीख समाज, खाटीक समाज, मारवाडी जैन समाज,तेली समाज, सिंधी समाज, झाबक परिवार, गुजराथी समाज,राजपूत समाज,पटेल समाज,वाणी समाज, कासार समाज ,ब्राह्मण समाज, पारेख, परिवार,अग्रवाल समाज, लाठी समाज, पांचाळ समाज, मराठा समाज आदी सर्वच समाजाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी सर्व महिला भगिनींनी लाल रंगाची साडी तर पुरुष बांधवानी कुर्ता परिधान केल्याने आम्ही सर्व समसमान असा संदेशही यातून दिला गेला. सुरवातीला शुभम महाराज यांनी महाआरतीचे महत्व व आरतीची संकल्पना विशद केली.त्यानंतर मनाला अतिशय भावेल अशी श्रध्दापूर्वक आरती पार पडली.सदर आरती प्रत्यक्षात 101 जोडप्यांची असताना प्रतिसाद वाढल्याने 171 जोडपी यात मनोभावे सहभागी झाली होती.आरती नंतर सर्व सहभागीं झालेल्या भाविकांना सती माताजी भक्त महेश राजपूत यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या अमळनेर तालुक्याचे ग्रामदैवत सती माताजी यांच्या प्रतिमेचे मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते वितरण झाले.तसेच ना अनिल पाटील यांची नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. महाआरतीतुन झालेल्या या सामाजिक एकतेचे मंत्री अनिल पाटील,पोलीस निरीक्षक विजय शिंदे यासह सहभागी झालेल्या सर्व भाविकांनी विशेष कौतुक केले.न्यू प्लॉट विकास मंचचे अध्यक्ष चेतन राजपूत यांच्या संकल्पनेतून ही महाआरती पार पडली.यासाठी नवरात्रउत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रणित झाबक, उपाध्यक्ष विशाल खिलोसिया, सेक्रेटरी केयुर ठक्कर,खजिनदार योगेश पवार यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
दरम्यान न्यू प्लॉट भागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात न्यू प्लॉट परिसर विकास मंचच्या वतीने आयोजित या नवरात्रोत्सवात घटस्थापनेपासून दररोज धार्मिक कार्यक्रम पार पडत असून रास गरबा व दांडिया रास ला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप,न्यू प्लॉट महिला मंच,महाराणा प्रताप मित्र मंडळ,लिओ क्लब,जैन जागृती सेंटर,टिळक मित्र मंडळ,न्यू प्लॉट मित्र मंडळ,राजेशहाजी मित्र मंडळ, सौरभ केरटर्स आणि सर्व व्यापारी मंडळाचे अनमोल सहकार्य लाभत आहे.