सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- येथील पातोंडा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सन 2021 ते 2026 पंचवार्षिक निवडणूकीच्या अंतिम माघारीच्या दिवशी 46 उमेदवारांपैकी 18 उमेदवारांनी माघार घेतली असून 13 जागांसाठी 28 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या 13 जागांसाठी एकूण 46 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत सर्व अर्ज वैध ठरले होते. दि.25 रोजी माघारीच्या अंतिम दिवशी दोन्ही पॅनलकडून शिताफीने 18 उमेदवारांकडून माघार घेण्यात आल्याचे चित्र दिसून आले. सर्वसाधारण जागेमधून लोटन पाटील, प्रभाकर पाटील, जयप्रकाश पवार, संजय पवार, प्रशांत पवार, दिवाकर पवार, रमेश बिरारी, युवराज बाविस्कर, प्रभाकर बाविस्कर, पंडित लाड, खासेराव पवार, महिला राखीव मधून विमलबाई बोरसे, सुनंदा पाटील, सुरेखा पाटील, ओबीसी राखीव मधून लोटन पाटील, रमेश बिरारी, अनु.जाती जमाती मधून पद्माकर वाघ, भटक्या जमाती मधून हिम्मत बेलदार आदी उमेदवारांनी माघार घेतली असून सर्वसाधारण 8 जागेसाठी आता मधुकर चौधरी, किशोर मोरे, जगतराव बोरसे, अनिल बागुल, कैलास पाटील, योगेश चौधरी, संभाजी बिरारी, सुभाष लाड, नेहरू पवार, अरुण पवार, सुनील पवार, राहुल पवार, खासेराव पवार, सुनील चौधरी, विठ्ठल बोरसे, हिरामण महाजन,महिला राखीवच्या 2 जागेसाठी मंदाबाई शिंदे, रत्नाबाई पाटील, रिता बाविस्कर, प्रतिभा पाटील, ओबीसीच्या 1 जागेसाठी भरत बिरारी, सुनील पवार,अनु. जाती जमातीच्या 1 जागेसाठी चुडामन संदानशिव, जगन्नाथ संदानशिव, जगन्नाथ सोनवणे तर भटक्या जमातीच्या 1 जागेसाठी राहुल लांबोळे, एकनाथ लोहार व वना मोरे आदीं उमेदवार रिंगणात उतरले आहेत. अखेर 13 जागेवर 28 उमेदवार रिंगणात उतरले असून मुख्य लढत ओबीसी प्रवर्गात होत असून आजी माजी सरपंचात लढत जुंपली आहे. या लढतीकडे ग्रामस्थांचे विशेष लक्ष असून शेवटी मतदानाच्या दिवशी शेतकरी मतदार कोणत्या पॅनल मध्ये आपले बहुमत टाकून सहकारी संस्थेच्या कार्यभार कोणत्या पॅनलच्या हाती देतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष वेधून आहे.