अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित न्हानभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात ग्रामविकास शिक्षण मंडळाचे आद्य संस्थापक कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी जयवंतराव मन्साराम पाटील, देविदास शामराव पाटील, देविदास बारकू पाटील यांनी प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. याप्रसंगी माजी प्राचार्य एल.जे. चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. कै. मन्साराम तुकाराम पाटील हे सहकार क्षेत्रातील तालुक्याचे नेते. तसेच लोकल बोर्ड सदस्य जळगाव, संस्थापक अध्यक्ष अमळनेर तालुका शेतकी सहकारी संघ, संस्थापक चेअरमन मारवड विविध कार्यकारी विकास सोसायटी, मा. सरपंच ग्रामपंचायत मारवड, चेअरमन तालुका सुपरवायझर युनियन लिमिटेड अमळनेर, मा. संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर असे विविध क्षेत्रात उल्लेखनीय पदे त्यांनी भुषविले होते. यावेळी महारु रामदास शिसोदे, सुरेश मन्साराम पाटील, साहेबराव नारायण पाटील, सुरेश भिमराव शिंदे, राजेंद्र फकीरा साळुंखे, दिनेश वासुदेव साळुंखे, प्रशांत वासुदेव साळुंखे, चंद्रकांत सिसोदे, मनोज हिम्मतराव पाटील, तसेच संचालक मंडळ उपस्थित होते. सरपंच आशाबाई सुभाष भिल, उपसरपंच भिकन भालेराव पाटील, गोवर्धनचे सरपंच पंकज युवराज निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत देसले, निंबा साहेबराव पाटील आणि प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, ज्यु. कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.