नामदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून 10 कोटी निधीस मिळाली मंजुरी…
अमळनेर:- येथील आमदार तथा राज्याचे मदत व पूर्नवसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांनी यंदाच्या दिवाळीत शेतकऱ्यांसाठी भरभरून करण्याचे नियोजन केल्याचे दिसत असून गेल्या आठवड्यात तालुक्यासाठी दुष्काळी योजना तसेच नुकसान भरपाईची भेट शेतकऱ्यांना दिली असताना आता पुन्हा अमळनेर मतदारसंघातील 50 गावांना शेतशिवार रस्त्यांना मंजूरी देवून मोठे गिफ्ट त्यांनी शेतकरी बांधवांना दिले आहे. सुमारे 10 कोटी निधीतून हे शेतरस्ते होणार आहेत.
विशेष म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अमळनेर मतदारसंघात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतशिवार रस्ते होणार असल्याने शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी सोय होणार आहे.ग्राम विकास व पंचायत राज विभाग तसेच स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत निधीतून हे रस्ते होणार आहेत. पहिल्या टप्प्यात अमळनेर मतदारसंघातील तब्बल ५० गांवाचा यात समावेश केला असून पुढील टप्प्यात उर्वरीत गावांना देखील शेतरस्ते मंजूर केले जातील, अशी माहिती नामदार अनिल पाटील यांनी दिली आहे. दहा कोटी निधीतून सदर ५० गावांतील रस्त्यांची कामे होणार आहेत. सदर मंजूरी बद्दल ना. अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, ग्राम विकास मंत्री ना.गिरीष महाजन व जिल्हयाचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत. तर शेतीसाठी आवश्यक असलेला रस्ता होणार असल्याने ग्रामस्थांनीही ना. अनिल पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे.
खालील गांवाचा आहे समावेश –
सदर 10 कोटी निधीतून खालील 50 गावांमध्ये गावाकडून शेताकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण होणार असून यासाठी प्रत्येक गावात 20 लाख रू. खर्च होणार आहेत. मौजे. हिंगोणे खु. प्रज, जानवे, पातोंडा, शिरूड, गांधली, वावडे हेडावे, चौबारी, मांडळ, कळंबू, तामसवाडी, अंतुर्ली, आमोदे, तासखेडा, निंभोरा, जळोद, नगाव खु., गडखांब, कंडारी, खेडी, टाकरखेडा, तरवाडे, खेडी प्रज, बोदर्ड, पळासदडे, पिंपळकोठा, जिराळी, इंधवे, रत्नापिंप्री, भोलाणे, वंजारी, दगडी सबगव्हाण, नगाव बु., निंब, रामेश्वर, वाघोदे, फाफोरे, सारबेटे, कुऱ्हे बु., आर्डी, अमळगांव, वसंतनगर, हिंगोणे खु.प्रअ, चिखलोद खु., गलवाडे बु., सावखेडा, निमझरी, नालखेडा, मंगरूळ, दापोरी इ. गावांचा समावेश आहे.