अमळनेर:- तालुक्यातील मौजे चौबारी येथे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मा. जिल्हा परिषद सदस्य जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते थाटात पार पडला.
या प्रसंगी कामगार नेते एल. टी. पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रापंचायत सदस्य यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी 2515 अंतर्गत संरक्षण भिंत बांधकाम करणे रक्कम (8 लक्ष), 2515 अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे (रक्कम 10 लक्ष) ही कामे पूर्णत्वास आल्याने याचे लोकार्पण जयश्री पाटील यांच्या हस्ते झाले तर 2515 अंतर्गत शेतशिवार रस्ता खडीकरण (रक्कम 20 लक्ष), सामाजिक न्याय अंतर्गत रस्ता काँक्रिटकरण (रक्कम 10 लक्ष), जिल्हा परिषद अंतर्गत 2515 रस्ता काँक्रिट (रक्कम 10 लक्ष) या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. सदर विकास कामांबद्दल ग्रामस्थांनी मंत्री अनिल भाईदास पाटील यांचे आभार व्यक्त केले.