अमळनेर:- येथील प्रताप महाविद्यालयाची विद्यार्थिनी सृष्टी शिंदे हिची १९ वर्षाखालील राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघासाठी निवड चाचणीसाठी निवड झाली आहे.
निवड चाचणी स्पर्धेसाठी नाशिक, मुंबई, नागपूर, अमरावती, छ. संभाजीनगर येथील संघातून महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार आहे. मलकापूर येथे ही चाचणी होणार आहे. सृष्टी ही जळगाव जिल्ह्याचे माजी कर्णधार मिलिंद शिंदे यांची कन्या असून प्रा अमृत अग्रवाल, संजय पवार, सचिन पवार यांनी अभिनंदन केले आहे.