अमळनेर:- जळगाव जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सहकार पॅनल मधून अमळनेरचे दोन उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आले आहेत.
साने गुरुजी विद्या मंदिर शाळेचे उपशिक्षक स्वप्नील वसंतराव पाटील आणि समता युवक केंद्र संचालित प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आशिष पवार हे सर्वसाधारण मतदार संघातून विजयी झाले. या निवडणुकीत सहकार पॅनलने सर्वसाधारण मतदारसंघातून 8 जागा जिंकत परिवर्तन पॅनलला चांगलाच धोबीपछाड दिला. अमळनेर शहरातून 11 इच्छूक उमेदवारांनी फार्म भरले होते मात्र त्यातून केवळ 2 उमेदवार बिनविरोध देऊन जळगाव भुसावळमधील स्वयंघोषित नेत्यांनी अमळनेर तालुक्याला पॅनलमध्ये स्थान दिले नाही,त्या अपमानापोटी अमळनेर तालुक्याने स्वतंत्र उमेदवारांची मोट बांधत सहकार पॅनल उभे केले. पॅनलचे नेतृत्व भुपेंद्र पाटील यांच्या कडे सोपवले. अमळनेरसह अहिराणीं पट्टीतील सभासद बंधूनी जोर लावत 11 पैकी 8 जागा जिंकत विरोधी पॅनलच्या उमेदवारांना लोळवले. अमळनेर तालुक्यातील विजयी संचालक स्वप्नील पाटील आणि आशिष पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
विजयी उमेदवार पुढील प्रमाणे…
सर्वसाधारण गट:- प्रफुल्ल वासुदेव सरोदे (६०३), राकेश गोकुळ पाटील (५८१), स्वप्निल वसंतराव पाटील (५४३), आशिष पुंडलिक पवार (५३१), प्रशांत गजानन साखरे (५१७), वना दामू महाजन (५११), अमित विजय चौधरी (४९७), सुनील शांतीलाल पवार (४९४), प्रसन्ना प्रभाकर बोरोले (४९२), सलीम इस्माईल तडवी (४९२), धनंजय भानुदास काकडे (४८१),
अनु.जाती – जमाती गट – गणेश चंद्रसिंग लोडते (५७९),
शिक्षकेत्तर गट– संतोष बाजीराव मराठे (५३१),
भटक्या विमुक्त जमाती गट– अविनाश आनंदराव घुगे (५३६),
इमाव– गोविंदा लोखंडे,
महिला गट रुपाली पाटील, स्वाती फिरके (बिनविरोध)