अमळनेर:- येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक तथा पत्रकार उमेश प्रतापराव काटे यांना महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. धुळे येथील राजश्री शाहू महाराज नाट्यगृहात रविवारी (ता.11 फेब्रुवारी) सकाळी साडेअकराला पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी भव्य शिक्षण परिषदेही आयोजित करण्यात आली होती.
माजी खासदार तथा राज्य सैनिकी शाळा असोसिएशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, पोलीस उपाधीक्षक एल एन कानडे (नाशिक), सहकार भारतीचे राष्ट्रीय संपर्कप्रमुख दिलीप पाटील यांच्या हस्ते उमेश काटे यांना सहपरिवार सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, आमदार सत्यजित तांबे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा पूजा खडसे, राज्य सैनिकी फेडरेशनचे सचिव तथा निवृत्त सुभेदार मेजर पी.डी. निंबाळकर, माजी सैनिक तथा आरटीओ इन्स्पेक्टर मुकेश देवरे (नंदुरबार) महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. शिवाजी पाटील, प्रदेश मुख्य कोषाध्यक्ष गजेंद्र कानडे, विभागीय अध्यक्ष डॉ. पंकज शिंदे, जिल्हा सचिव अभय नंदन (संभाजीनगर) आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उमेश काटे यांच्या समवेत त्यांचे कुटुंबीय शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जयेशकुमार काटे, गायत्री काटे, वैशाली सोनवणे, निकिता काटे, शाहूराजे काटे, दक्षता काटे आदींनी हा सन्मान स्वीकारला.