अमळनेर:- तालुक्यातील खवशी येथील रहिवासी तथा बीएसएफ मध्ये कार्यरत असलेले सुनिल सुरेश सोनवणे यांचे कर्तव्यावर असताना दिनांक १५ रोजी आकस्मिक निधन झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
सदर जवानाच्या मृत्यूची प्राथमिक माहिती काल सकाळी कुटुंबियांना मिळाली आहे, मात्र मृत्यू कोणत्या कारणाने झाला याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही.या घटनेने खवशी गावात शोककळा पसरली आहे. सदर जवानाचे पार्थिव आणून गावातच अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या पश्यात पत्नी, आई वडील,एक मुलगा,एक मुलगी भाऊ असा परिवार आहे.