अमळनेर व पारोळा तालुक्यातील बंजारा समाज बांधवांची उपस्थिती…
अमळनेर:- शहरात दिनांक 15 रोजी श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्ताने भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. यावेळी बंजारा समाज बांधवांची मोठी उपस्थिती होती.
शहरातील महाराणा प्रताप चौक येथून संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी अमळनेर व पारोळा तालुक्यातील बंजारा समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.उपस्थित बंजारा समाज बांधवानी श्री संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून ढोल ताश्याच्या गजरात भव्य मिरवणुक निघाली. यावेळी रामेश्वरचे सरपंच गजेंद्र जाधव, किरण जाधव,एकनाथ जाधव, चंदू जाधव, रमेश चव्हाण, राजेश राठोड, चेतन जाधव, राहुल चव्हाण,अनिल जाधव, रणजित राठोड,संजय राठोड, किशोर पवार, नरेंद्र राठोड, ज्ञानेश्वर राठोड,संजय वंजारी, हेमंत पवार समवेत अनेक बाल गोपाल महिला आदी उपस्थित होते.