बिनविरोध निवडणुकीची परंपरा राहिली अबाधित…
अमळनेर:- येथील खानदेश शिक्षण मंडळाच्या माध्यमिक व प्राथमिक कर्मचारी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली असून बिनविरोध निवडणुकीची परंपरा अबाधित राहिली आहे.
अमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळाच्या माध्यमिक व प्राथमिक पतसंस्थेची (२०२४- २०२९ ) पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.यात एकूण ११ संचालक बिनविरोध निवडुन आले आहेत.यात सर्वसाधारण मतदारसंघातून आर.जे. पाटील, राहुल जगतराव पाटील,बाविस्कर कैलास राजधर,पालवे दिनेश नामदेव, पाटील मनोहर गुलाबराव, पाटील लक्ष्मण नथ्थू, महिला मतदारसंघातून पाटील वैशाली जितेंद्र, भालेराव जयश्री सुरेश, इतर मागासवर्गीय मतदारसंघातुन सनेर किरण प्रकाश, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातुन बत्तीसे संजय गंभीर तर वि.जा.भ.ज मतदारसंघातुन कंखरे चंद्रकांत सदाशिव बिनविरोध निवडून आले आहेत. सर्वसाधारण मतदारसंघातुन प्रशांत पवार यांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. निवडणूक अधिकारी म्हणून एस.पी.महाजन यांनी काम पाहिले.
निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खा.शि.मंडळाचे शिक्षक प्रतिनिधी विनोद कदम, जी.एस.हायस्कूलचे मुख्याध्यापक बी.एस. पाटील, द्रो.रा.कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस.सूर्यवंशी, प्रताप हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रमोदीनी पाटील, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका एस.पी.सिसोदे व कैलास पाटील तसेच खा.शि.मंडळाच्या माध्यमिक व प्राथमिक शाळांचे सर्व पदाधिकारी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडण्यास मदत झाली.