अमळनेर:- शासनाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी किमान आणि कमाल मर्यादा निश्चित केली आहे.
शासन निर्णयानुसार बालकांच्या वयासाठी ३१ डिसेंबर मानीव दिनांक ठरवण्यात आली आहे. त्यामुळे जुलै ते नोव्हेंबर मध्ये जन्मलेल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी किमान व कमाल वयोमर्यादा निश्चित केली आहे. आरटीई प्रवेशासाठी प्ले ग्रुपसाठी वयोमर्यादा ३ ते साडे चार वर्षे , ज्युनियर के जी साठी ४ ते साडे पाच वर्षे , सिनियर के जी साठी ५ ते साडेसहा वर्षे आणि पहिलीसाठी सहा वर्षे ते साडे सात वर्षे वयोमर्यादा ग्राह्य धरण्यात येणार आहे.