देवळी येथील तरुणाने केली आत्महत्या, सांगलीतील तिघांविरुद्ध गुन्हा…
अमळनेर:- आर्मी मध्ये नोकरी लावून देतो म्हणून घेतलेले दोन लाख रुपये परत दिले नाही व नोकरीही दिली नाही म्हणून तालुक्यातील देवळी येथील एका तरुणाने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील तिन्ही प्रशिक्षकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवळी येथील सागर संजय बैसाणे हा २०२१ मध्ये म्हैसाळ (ता मिरज जिल्हा सांगली) येथे मानसी करियर अकादमी मध्ये प्रशिक्षण घेत होता. तेथे असलेले प्रशिक्षक सुशांत सुनील उबाडे (रा वाळे खिंडी ता जत जिल्हा सांगली) अकादमीचे संस्थापक अनिल भरत कांबळे (रा कर्मवीर नगर म्हैसाळ ता मिरज जिल्हा सांगली), महादेव विलास सातपुते (रा लोणारवाडी ता कवठे महाकाळ जिल्हा सांगली) यांनी ७ एप्रिल २०२२ रोजी सागर याला मिल्ट्रीच्या बीआरओ मध्ये नोकरीला लावण्यासाठी साडे सहा लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी त्यांना एक लाख रुपये देण्यात आले. त्यांनंतर अनिल कांबळे याला कॅन्सर झाल्याने अकादमी बंद करण्यात आली. पुन्हा ऑक्टोबर २०२२ मध्ये सुशांत उबाळे याने एक लाख रुपयांची मागणी केली. तिघांनी सागर याला सरकारी नोकरी न देता कॅन्टीन मध्ये मजुरीला लावून दिले. सागर याने दिलेले दोन लाख रुपये परत मागितले असता त्यांनी नकार दिला. म्हणून वैतागून सागर याने २२ जानेवारी रोजी रेल्वे खाली झोकून देत आत्महत्या केली. म्हणून सागरचे काका सुभाष बैसाणे यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपस पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.