टाकरखेडा येथील एकाविरुद्ध विनयभंग व ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल…
अमळनेर:- महिला लहान मुलासह घरात एकटी झोपलेली असताना एकाने घरात घुसून तिला माझ्याशी प्रेम करशील का ? म्हणत विनयभंग केल्याची घटना १७ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.
तालुक्यातील टाकरखेडा येथे सुनील शांताराम पाटील याने महिला घरात एकटी असल्याचे पाहून तिच्या घरात जाऊन तिला प्रेमाची विचारणा केली. आणि महिलेचा हात धरला. महिलेने हात झटकून घराबाहेर पळून गेली. सायंकाळी महिलेचा पती कामावरून परत आल्यानंतर दोघेही सुनील याला जाब विचारायला गेले असता त्याने दादागिरी केली. त्यांनंतर महिलेने नातेवाईकांशी विचार विनिमय करून सुनील विरुद्ध विनयभंग व ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला असून तपास डीवायएसपी सुनील नंदवाळकर करीत आहेत.
Related Stories
December 22, 2024