अमळनेर:- तालुक्यातील निंभोरा येथे गावठी दारू तयार करणाऱ्या दोघांवर मारवड पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे.
निंभोरा येथे रामचंद्र महादू कोळी हा चिखली नदीकाठी गावठी दारू तयार करत असल्याची माहिती मिळाल्याने मारवड पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता त्याच्याकडे गावठी दारूचे ३० लिटर पक्के रसायन, ३०० लिटर कच्चे रसायन यांच्यासह तयार दारू मिळून आल्याने पोलिसांनी नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा जागीच नाश केला. तसेच त्याभागात बाबूलाल महादू कोळी हा देखील गावठी दारू निर्मिती करत असल्याने पोलिसांनी छापा टाकला असता त्याच्याकडे कच्चे व पक्के रसायन मिळून आल्याने पोलिसांनी पंचनामा करून उरलेल्या साहित्याचा जागीच नाश केला. दोघांविरुद्ध मारवड पोलिसांत दारूबंदी कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ संजय पाटील हे करीत आहेत.