
अमळनेर:- तालुक्यातील अमळगावजवळ पत्त्यांच्या अड्ड्यावर मारवड पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून कारवाई करत मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेतले आहे.

९ मे रोजी मध्यरात्री १२:५५ वाजता अमळगाव ते जळोद रस्त्यालगत साई प्रसाद हॉटेलपुढे तीनशे मीटर अंतरावर असलेल्या पत्री शेडमध्ये पत्ते खेळत असल्याची माहिती मिळाल्याने मारवड पोलिसांनी छापा टाकला असता दिपक मगन भोई (वय २७ रा. दोधवद ता. अमळनेर), मनोज विश्वनाथ कोळी (वय ३० रा.बुधगाव ता. चोपडा) अजय कृष्णा मोरे (वय ३९ रा. अमळगाव), रमेश मुरलीधर पाटील (वय ४० रा.वेळोदा ता.चोपडा) राकेश गंगाराम महाजन (वय ४४ रा.माळी वाडा, अमळनेर), राजेंद्र एकनाथ बडगुजर (वय ५५ रा.प्र. डांगरी), दिपक ईश्वरलाल महाले (वय ३२ रा. धरणगाव) हे सात जण पत्ते खेळताना आढळून आले. त्यांच्याजवळ ३१,४०० रुपये रोख, पत्ते असा मुद्देमाल मिळून आला. सदर आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून मु.जु. ऍक्ट कलम १२ (अ) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे.कॉ. सुनिल अगोणे हे करीत आहेत.
अमळगाव येथे हायस्कूलच्या पाठीमागे तसेच परिसरात इतर ठिकाणी नेहमी पत्त्यांच्या डाव सुरू असतो आणि इतर तालुक्यातून ही याठिकाणी शौकीन पत्ते खेळण्यासाठी येतात व त्यातून लाखोंची उलाढाल होते अशी खात्रीशिर माहिती असून त्याठिकाणी ही कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.