मारवड प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे जनजागृतीपर उपक्रम साजरा…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथे जागतिक जागतिक डेंग्यू दिन ग्रामपंचायत सभागृहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात डेंग्यू प्रतिबंधक सुरक्षित उद्यासाठी आमची जबाबदारी या घोषवाक्याने करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य पर्यवेक्षक प्रशांत फुगे, सरपंच आशा सुभाष भिल, ग्राम विस्तार अधिकारी रवींद्र सनेर हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर वाय पाटील यांनी करत डेंग्यू बद्दल माहिती व जनजागृती केली. आरोग्य पर्यवेक्षक प्रशांत फुगे यांनी डेंगूचे निर्मूलन संदर्भात आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामपंचायत स्तरावर काय काय उपाययोजना करता येतील या संदर्भात मार्गदर्शन केले. वैद्यकीय अधिकारी निखिल पाटील यांनी डेंग्यू मुक्त ग्रामपंचायत साठी संकल्प करून गावात डेंग्यू होणार नाही यासाठी आरोग्य कर्मचारी यांना सूचना दिल्या व गाव डेंग्यू मुक्त होण्यासाठी संकल्प केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार योगेश कापडणे आरोग्य सेवक यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी निखिल पाटील, विद्या देवरे, आरोग्य पर्यवेक्षक प्रशांत फुगे , ग्रामविकास अधिकारी श्री रवींद्र सनेर, ग्राप लिपिक सुभाष पाटील यांचे सहकार्य लाभले. यावेळी अशोक पाटील, कासम खाटीक, दीपक पाटील, नामदेव चौधरी, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील, आरोग्य सेवक योगेश कापडणे, दीपक पाटील, आशा सेविका संगीता चौधरी, राजश्री पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.