अमळनेर:- तालुक्यातील सोनखेडी येथील ३३ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याबाबत अमळनेर पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.
सोनखेडी येथील मच्छिन्द्र भाईदास मालचे (वय ३३) हा २५ रोजी दुपारी २ वाजता बाहेर जाऊन येतो असे सांगून बेपत्ता झाला आहे. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत.