अमळनेर:- तालुक्यातील आंचलवाडी शिवारातून अज्ञात चोरट्यानी २२ गाळ्यांमधून ५ हजार २८० मीटर विद्युत तार चोरून नेल्याची घटना ९ रोजी उघडकीस आली.
आंचलवाडी शिवारातील बळवंत हिलाल पाटील यांच्या शेतातील २२ गाळ्यांमधील विद्युत खांबांवरील २० हजार रुपये किमतीची ५२८० मीटर तारा अज्ञात चोरट्याने नेल्याची निदर्शनास आले. विद्युत अभियंता श्यामकांत भास्कर पाटील यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. त्यांनतर अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून विद्युत कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण कुमावत करीत आहेत.