श्याम पाटील व सामाजिक कार्यकर्त्यांचे तहसीलदारांना निवेदन…
अमळनेर:- नीट NEET परीक्षा प्रक्रियेत लाखो विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाबाबत अमळनेर तालुक्यातील नीटच्या विद्यार्थ्यांना घेऊन शहराध्यक्ष श्याम पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यालयावर धडक देत तहसीलदार यांना निवेदन देऊन संतप्त विद्यार्थी व पालकांच्या भावना शासनापर्यंत पोहोचण्याची मागणी केली.
अमळनेर तहसील कार्यालय येथे अंमळनेर आतील नीटच्या परीक्षार्थींना सोबत घेऊन तहसील कार्यालय येथे उपस्थित तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. ५ मे २०२४ रोजी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात प्रवेश मिळविण्यासाठी N.T.A कडून घेण्यात आलेल्या नीट NEET परीक्षेसाठी संपुर्ण देशातून २४ लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता त्यात एकट्या महाराष्ट्रातून २.७९ लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी २ ते ३ वर्षापासून तयारी करत असतात. त्यासाठी त्यांच्या पालकांकडून परिस्थिती नसतांना देखील अनेक अडचणींचा सामना करत लाखो रुपये खर्च होतात. ४ जून २०२४ रोजी या परीक्षेचा निकाल लागला व त्यात झालेल्या गैरप्रकार यामुळे प्रकारावरून या परीक्षा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणत भ्रष्टाचार करून काही धनाढ्य पालक व विद्यार्थी मिळून संपुर्ण यंत्रणा विकत घेत १००% गुण मिळविले असल्याने अश्या गैरमार्गाने वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी भविष्यात डॉक्टर होऊन समाजात आपला व्यवसाय करतांना अनेकांच्या जीवाशी देखील खेळतील. यामुळे देशाच्या भविष्याला मोठा धोका आहे असे यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.
विद्यार्थ्यांचा व पालकांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कमी होऊन सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना अशा गैर प्रकारांमुळे झळ सोसावी लागेल तरी शासन स्तरावर तातडीने पावले उचलून निट परीक्षेत अन्याय झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी याप्रसंगी तहसीलदार सुराणा यांना निवेदन देतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार शहराध्यक्ष श्याम पाटील यांनी केली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांच्या वतीने तहसिलदार यांच्याकडे सदर प्रश्न शासनाने गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रा.डॉ. लिलाधर पाटील, अर्बन बँक संचालक रणजित शिंदे, शिसोदे सर, गिरीश पाटील, याप्रमुख मान्यवरांसह नीट परीक्षार्थी कु.उर्वशी पाटील, कु.गिताली बेहरे, कु.ऋतुजा चौधरी, हितेश शिंदे,धनिक्षक साळुंखे, अभिजीत साळुंखे, आदित्य सनेर, सुमित गेलानी, अभिषेक पाटील, सृजन खैरनार,पियुष शिरसागर, अथर्व पाटील, मानस भावरे, अथर्व कुलकर्णी, तेजस पाटील,मेहुब शिसोदे,दर्शन पाटील, सोहम शिंदे, सारंग पाटील, अंबरीष कोलाबकर, सुशीलकुमार शिसोदे, मोहतशिम काझी, अनिरुद्ध शिसोदे,अक्षय चव्हाण, तुषार संदानशिव, देव गोसावी, उज्ज्वल मोरे आदींसह युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.