पैलाडपासून निघालेल्या रॅलीचा स्व. उदय वाघ यांच्या स्मारकाजवळ समारोप…
अमळनेर– स्मिता उदय वाघ खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल अमळनेर नगरीत दाखल झाल्या तेव्हा त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. रॅलीद्वारे त्यांचे स्वागत करण्यात आले. स्वागत यात्रा पैलाडपासून सुरू होवून दगडी दरवाजा, बसस्थानक, महाराणा प्रताप चौक मार्गे स्व. उदय वाघ यांच्या स्मारकाजवळ समारोप करण्यात आला.
या स्वागत यात्रेत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यासह महायुतीचे सर्व सहकारी उपस्थित होते. स्वागत यात्रेच्या मार्गावरून ठिकठिकाणी रांगोळी, स्वागत कमानी, मोठेमोठे स्वागत बॅनर लावलेले होते. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती. यावेळी मोदी जिंदाबाद, भाजप जिंदाबाद, उदय वाघ अमर रहे अशा घोषणा नागरिकांनी दिल्या. यावेळी स्मिता वाघ यांनी सांगितले की, पाडळसरे धरणाचा प्रश्न लवकर सोडवू, ते फायनल स्टेजला आहे, केंद्रामध्ये जल शक्ती मंत्री सी. आर. पाटील आहेत. त्यामुळे पाठपुरावा करून पाडळसरे धरणाच्या कामाला प्राधान्य देवू. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस,ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन, मदत व पूनर्वसन मंत्री अनिल पाटील, पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी मागच्या काळात भरपूर प्रयत्न केल्यामूळेच आज पाडळसरे धरण फायनल स्टेजला पोहचले आहे, असे बोलायला पण त्या विसरल्या नाहीत. यावेळी माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, लोणचे महेश पाटील, माजी सुभाष चौधरी, माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी, दिलीप ठाकूर, रामराव पवार, गणेश अनिल वाणी, भैरवी पलांडे, समाधान पाटील, हरचंद लांडगे, दीपक भोई, महेश पाटील, मच्छिंद्र लांडगे, अमोल महाजन, रोहन मुंदडा, देवा लांडगे, देविदास देसले, शिवाजी पाटील, मुक्तार खाटीक, कविता पवार, प्रथमेश पवार, विजय वानखेडे, भरत परदेशी, रहीमतुला पिंजारी, रमेश धनगर, भरत परदेशी, भावेश चौधरी, नितीन अशोक कोष्टी, हर्षल महाजन, शिवदास महाजन, बापू हिंदुजा, मनोहर पाटील, गणेश बडगुजर, राजू देसले, रवींद्र पाटील, अमोल महाजन, राकेश शर्मा, देवेंद्र तायडे, अशोक पाटील, नरेंद्र निकुंभ, सुभाष चौधरी, प्रदीप साळवी, प्रकाश ताडे, दिनेश नाईक, विजय राजपूत, हरचंद लांडगे, शीतल देशमुख, उमेश वाल्हे, भारती सोनवणे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संध्या शाह, ऍड. रमाकांत माळी, रितेश जैन, सरचिटणीस दिलीप ठाकूर, गोकुळ परदेशी, उपाध्यक्ष सुभाष पाटील, कैलास भावसार, दीपक भोई, चंद्रकांत कंखरे, कमल समाधान पाटील, गोकुळ पाटील, गणेश बडगुजर, शिवाजी राजपूत, राकेश पाटील,पंकज भोई, देवा लांडगे, सौरभ पाटील, कल्पेश पाटील, रितेश सोनवणे, राकेश पाटील, राजेश खरारे, भिकेश पाटील, हिरालाल पाटील, संदीप पाटील, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.