सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने राजर्षी शाहू महाराज सर्कलच्या भव्य फलकाचे अनावरण…
अमळनेर:- येथील राजर्षी शाहू महाराज चौकात शाहू महाराज यांची १५० वी जयंती विविध राजकीय व सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने राजर्षी शाहू महाराज सर्कलच्या भव्य फलकाचे अनावरनाने साजरी करण्यात आली.
राजर्षी शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने अमळनेर येथील ढेकू रोड वरील राजर्षी शाहू महाराज चौक येथे शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राजर्षी शाहू महाराज सर्कलच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी करण्यामागील उद्देश संयोजक माजी नगरसेवक शाम पाटील यांनी सांगितला. तर उपस्थित मान्यवरांना लोकराजा शाहू महाराज चौकाच्या होवू घातलेल्या आगळ्या वेगळ्या सुशोभीकरणात आपले उस्फुर्त योगदान देण्याचे आवाहन अमळनेर अर्बन बँक संचालक रणजित शिंदे यांनी यावेळी केले.
याप्रसंगी खान्देश शिक्षण मंडळाचे माजी कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे, पोलीस निरीक्षक विकास देवरे, युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अशोक पवार, प्रा.डॉ. लिलाधर पाटील, कृ.उ.बा संचालक प्रा.सुभाष पाटील, मराठा सेवा संघाचे जेष्ठ मार्गदर्शक मनोहर पाटील , धनदाईमाता एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डी.डी. पाटील,जयवंतराव पाटील , काँग्रेसचे अध्यक्ष प्रा.बी.के. सूर्यवंशी, हिरामण कंखरे, डी. ई.पाटील, एस डी.देशमुख, हृदयनाथ मोरे, अतुल डोळस, दर्पण वाघ, महेश पाटील, उज्वल मोरे, अनिरुध्द शिसोदे, अक्षय पाटील, शुभम पवार, राहुल पाटील, निखिल सूर्यवंशी, मयूर पाटील, निलेश बडगुजर, कुणाल चौधरी, अजिंक्य चिखलोदकर व परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी उपस्थितांना पेढे वाटले तर येथील मेघनगरी इमारतीवर भव्य असे राजर्षी
शाहू महाराज यांचे दर्शनी भागात लावण्यात आलेले चित्र सर्वांचे लक्ष वेधत होते.