अमळनेर रोटरी क्लबमार्फत प्रोटीन किटचे ३० डब्बे वाटप…
अमळनेर:- येथील रोटरी क्लब अमळनेर व ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार रोजी कुपोषित बालकांचे आरोग्य तपासणी शिबिर ग्रामीण रुग्णालयात आयोजित करण्यात आले.
यावेळी बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली व रोटरी क्लब मार्फत त्यांना प्रोटीन किटचे ३० डबे वाटप करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रांजली पाटील डॉ. पी.के तांबे यांच्या मार्गदर्शनाने बालरोग तज्ञ तथा वैद्यकीय अधिकारी रो. डॉ. जी. एम. पाटील यांनी तपासणी केली. यावेळी काही बालकांची रक्तांची चाचणी, एक्स-रे संदर्भ सेवा व सुविधा देण्यात आल्या.यावेळी रोटरीचे अध्यक्ष रो. ताहा बुकवाला, रो.डॉ दिलीप भावसार, रो. प्रदीप पारख, रो.प्रतीक जैन, रो.देवेंद्र कोठारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.सुमित पाटील, डॉ.गणेश पाटील, डॉ. परेश पवार, डॉ.तनुश्री दामले, डॉ नरेंद्र पाटील ,डॉ प्रिया पटेल, वैशाली पाटील, गिरीश शिंदे, आरोग्य सेविका पुनम नारे, समुपदेशक अश्वमेध पाटील, अशोक सोनवणे, सीडीपीओ प्रेमलता पाटील यांनी परिश्रम घेतले.