अमळनेर:- तालुका कृषी विभाग व शेतकरी यांच्या संयुक्त विद्यमाने एक जुलै कृषी दिन या दिवशी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे यांनी केले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, कृषी अधिकारी अविनाश खैरनार, कृषी खात्यातील कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच तालुक्यातील शेतकरी बंधूंनी देखील रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला. याप्रसंगी एकूण 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांकडून जीवनश्री रक्तपेढी, अमळनेर व जीवन ज्योती रक्तपेढी, धुळे यांनी रक्ताचे संकलन केले. त्याचबरोबर विभागाच्या कृषी संजीवनी पंधरवाड्याचा समारोप देखील करण्यात आला.
तालुका कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी नेहमी विविध संकल्पना राबवून शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत असतात, असे प्रतिपादन पिंगळवाडे येथील प्रगतिशील शेतकरी प्रवीण पाटील यांनी यावेळी केले व स्वतः देखील रक्तदान करून सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रक्तपेढीचे संतोष पाटील बाळासाहेब गव्हाणे तसेच कृषी पर्यवेक्षक योगेश वंजारी, दीपक चौधरी, महेंद्र पवार, अमोल कोठावदे, प्रवीण पाटील, राजेंद्र पवार, गणेश पाटील, विद्या पाटील व सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.