अमळनेर:- शहरातील ढेकूरोडवरील पथदिवे बंद झाल्याने पावसाळ्यात मॉंर्निग वॉकसाठी आणि नाईट वॉकसाठी नागरिकांची गोची झाली आहे. मात्र या समस्येकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.
अमळनेर शहरातील ढेकू रोडवर कृषी कॉलनी ते सार्वजनिक बांधकाम ऑफिस या रस्त्यावर पथदिवे उभे केले असून यामुळे शहरातील महिला व पुरुषांना पायी चालण्यासाठी या दिव्यांचा खूप मोठा आधार झाला आज. मात्र त्यात सार्वजनिक बांधकाम खात्याने हे दिवे उभे केले. मात्र ते पालिकेकडे हस्तांतरीत झाले आहेत. पालिकेची या दिव्यांबाबत जबाबदारी असून सध्या दिवे मात्र बंद आहेत. पथदिवे असले की यामुळे पायी फिरणाऱ्यांना सोपे जाते मात्र सध्या ते बंद अवस्थेत आहेत. शहरातील रोज हजारच्या वर महिला पुरुष या दिव्यांच्या सहाय्याने मॉंर्निग वॉक करण्यासाठी टेकडीपर्यंत जातात. हे दिवे मात्र बंद पडले आहेत. आता तब्बल महिनाभरापासून बंद आहेत. याबाबत परिसरातील नागरिकांनी तक्रारी करूनही याबाबत कोणतेही हालचाल पालिकेने केली नाही. दरम्यान पावसाळा असून याबाबत फिरणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. पावसाळ्यात सरपटणारे प्राणी व इतर कीटकांचा त्रास असल्याने फिरणारे बंद झाले आहेत. तरी हे दिवे त्वरित सुरू करून उपाययोजना तत्काळ करावी अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.