संपूर्ण खान्देशासह परराज्यातून ही भाविक आल्याने दर्शनासाठी लांबच लांब रांगा…
अमळनेर:- महाशिवरात्री पर्वावर शिवलिंग पूजन व कपिलेश्वर महात्म्य श्रवणाने पितृशांती सह पुण्यफल प्राप्त होते असे प्रतिपादन कपिलेश्वर मंदिराचे मठाधिपती महामंडलेश्वर हंसानंद महाराज यांनी कपिलेश्वर मंदिर स्थळी तापी व पांझरा संगमस्थळी महाशिवरात्री निमित्त भक्तना शिव महिमा व कपिलेश्वर महात्म्यावर प्रवचन करतांना काल दिनांक १ रोजी कपिलेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी व तापी पांझरा संगमस्थळी स्नानासाठी जमलेला भक्तांना कपिलेश्वर महादेवाचा महिमा सांगतांना केले.
सुर्यकन्या तापी व पांझरा नदीच्या संगमावरील दक्षिण तिरावरील एक हजार वर्षांपूर्वीचा इतिहास लाभलेले खान्देशातील जागृत देवस्थान श्रीक्षेत्र कपिलेश्वर येथील त्रिपींडी महादेव मंदिरस्थळी दोन वर्षाच्या कोरोनामुळे बंद असलेल्या यात्रोत्सव पुन्हा सुरू झाल्याने महामंडलेश्वर हंसानंद महाराज व तहसीलदार मिलिंद वाघ यांच्याहस्ते बेलपत्र व त्रिवेणी संगम असलेल्या नदीच्या पाण्याने दुग्धाभिषेक करून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झाले यावेळी भक्त परिवार व भविकवर्ग मोठ्या प्रमाणावर जमलेला होता. महाशिवरात्री निमित्ताने पवित्र पांझरा, गुप्त गंगा व तापिस्नान आदींसह कपिलेश्वर महिमा व महात्म्य विषयी हंसानंद महाराज यांनी भक्तांना शिव महिमा वर्णिला, यावेळी महामंडलेश्वर हंसानंद महाराज यांनी प्रांत,व सांज समयी तापी आरती करून भाविकांना कपिलेश्वर महात्म्य व शिव महिमा वर्णन करतांना सांगून हिंदू धर्म ग्रंथात शिवलिंग पूजनाची महती विशद केल्याचे सांगून आलेल्या भक्तांना खडीसाखर वाटून प्रसाद दिला. व सगळ्याना गुरुर् ब्रह्म,गुरुर् विष्णू, गुरुर् देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरूवे नमः म्हणून आशीर्वाद दिलेत व कपिलेश्वर त्रिपिंडी महादेवाची व तापिमाईची सांज आरतीने प्रवचनाची सांगता झाली. खान्देशातील पुरातन काळापासूनचा इतिहास असलेल्या या मंदिराची महिमा सर्वदूर असल्याने हंसानंद महाराज यांचा भक्त परिवार सह कपिलेश्वर महादेवाचे भक्त जळगाव, धुळे,नंदुरबार सह गुजरात, मध्यप्रदेश येथून भाविक दर्शनासाठी आलेले होते. हंसानंदजी महाराज यांनी या मंदिरावर दधीची ऋषींच्या नावे गुरुकुल वेद पाठशाळा सुरू केल्याने येथे वेदासह धार्मिक होम हवन तर्पण विधीसह इतर धार्मिक ध्यानाबरोबर संस्कार याची शिकवण महाराज विद्यार्थ्यांना देत आहेत.मंदिर परिसरात दिवसभर वेदमंत्रांचा उच्चार कानावर एकूण मन प्रसन्न होत असल्याचा भाविक बोलून दाखवितात. कपिलेश्वर मंदिर समितीचे विश्वस्त मगन पाटील, सचिव सी एस पाटील, ज्ञानेश्वर पवार, डॉ एल डी चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, लोटन पाटील, मधुकर चौधरी, तुकाराम चौधरी, सुभाष पाटील, लादू चौधरी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कपिलेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी आलेल्या माजी आमदार स्मिताताई वाघ व भाजपच्या युवा नेत्या भैरवी वाघ पलांडे यांनी मंदिराच्या संरक्षण भिंतीसाठी निधी बाबत मागणी करत असून कामाला लवकर सुरुवात करण्यासाठीच पाठपुरावा करणार असल्याचे मंदिर समितीला सांगितले.