
अमळनेर:- धार रस्त्यावर असलेल्या शिवटेकडीवर पर्यावरण संरक्षण उपक्रमांतर्गत प्रताप शिंपी आणि ब्रदर्स अकादमी च्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले.
प्रताप शिंपी,मनोज माळी, मधू चौधरी , गिरीश पाटील , बबलू पाटील , किशोर पाटील , हेमंत चौधरी , रवी पाटील , गणेश शिंदे यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी शिवटेकडीवर अनेक झाडे लावली. एकूण १०१ रोपे लावण्यात आली असून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी शिव टेकडी ग्रुपने घेतली आहे. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन, व त्याचे महत्त्व, वृक्ष संगोपन याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी अल्पोपहाराची व्यवस्था प्रताप शिंपी यांच्याकडून करण्यात आली होती.

