जी.एस. हायस्कूल चा ८६वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
अमळनेर (प्रतिनिधी):- जी व्यक्ती कष्ट,मेहनत व जिद्दीने पुढे जाते त्याला यश हमखास मिळत असते.जो शिकतो,ध्येय गाठतो त्याला कुठल्याच आरक्षणाची गरज पडत नसून आयुष्यात ध्येय ठरविल्याने यशाचा मार्ग सोपा होत असल्याचे उद्गार जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी काढले.खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस. हायस्कूल च्या ८६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणातून त्या बोलत होत्या.प्रमुख पाहुणे संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.संदेश गुजराथी होते.
यावेळी पुढे बोलतांना खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले की,राज्याच्या शैक्षणिक प्रगतीत खानदेश शिक्षण मंडळाचा विशेष वाटा राहिला आहे.मराठी शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.शाळेला विद्यार्थ्यांसाठी व्यायामशाळा तसेच अटल लॅब च्या माध्यमातून निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्योपाध्यक्ष सी.ए.नीरज अग्रवाल,अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख,माधुरी पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे,संचालक योगेश मुंदडे,प्रदीप अग्रवाल,डॉ.अनिल शिंदे,शाळेचे चेअरमन हरी भिका वाणी,संस्थेचे देणगीदार विवेकानंद भांडारकर,अभिजित भांडारकर,निलेश भांडारकर,अनिल वैद्य,संस्थेचे सचिव डॉ.ए.बी.जैन, सहसचिव प्रा.धीरज वैष्णव, माजी संचालक प्रवीण जैन,शिक्षक प्रतिनिधी विनोद कदम,लायन्स क्लब चे विनोद अग्रवाल,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सुखदेव माळी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर.सी. मोराणकर, व्ही.व्ही.कुलकर्णी,द्रो.रा. कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस.सूर्यवंशी,कैलास पाटील, स्वप्ना शिसोदे,सुनंदा चौधरी, ए.डी.भदाणे, एस.आर.शिंगाने, सी.एस.सोनजे,एस.पी.वाघ,के.पी.पाटील उपस्थित होते.
यावेळी डॉ.अनिल शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,मराठी शाळांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.शिक्षक भरती हा महत्वाचा प्रश्न असून तो सोडविण्यावर शासनाने भर देण्याची गरज आहे.शाळेचे चेअरमन हरी भिका वाणी यांनी शाळेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.यावेळी केक कापण्यात आला,शालेय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले तसेच शाळेचा वर्धापन दिनाचा लोगो फुग्यांचा सहाय्याने मान्यवरांच्या उपस्थितीत आकाशात सोडण्यात आला. अध्यक्षांचा परिचय देवयानी भावसार यांनी करून दिला.अहवाल वाचन आर.जे.पाटील यांनी केले.
यावेळी एसएससी परीक्षा,विविध स्पर्धा परीक्षा तसेच क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य संपादन केलेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. मंगळग्रह सेवा संस्था तसेच इतर देणगीदार यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना दप्तर,गणवेश तसेच इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन ए.ए.पाटील यांनी केले. आभार एस.पी.वाघ यांनी मानले