
अमळनेर : येथील पूज्य सानेगुरुजी माध्यमिक शिक्षक व इतर नोकर वर्गाच्या पतपेढीच्या अध्यक्षपदी सहकार पॅनलचे सुशील धंनजय भदाणे यांचा ६ विरुद्ध ५ मतांनी विजय झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील महाजन यांनी काम पाहिले.
रमेश चव्हाण यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानन्तर ३ रोजी अध्यक्षपदाची निवड जाहीर झाली होती. सहकार पॅनलतर्फे सुशील भदाणे यांनी तर माऊली पॅनलतर्फे प्रतिभा जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भदाणे याना सहा मते पडली तर जाधव यांना पाच मते पडली. निवड सभेस महेश नेरपगारे , संजीव पाटील ,रमेश चव्हाण , मंदाकिनी भामरे , सविता बोरसे आदी संचालक हजर होते. निवडणूक कामी सागर पाटील ,अजय पाटील ,रवींद्र पाटील यांचे सहकार्य लाभले. पतपेढीच्या अध्यक्षपदी निवड जाहीर होताच मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुषार बोरसे , पतपेढीचे माजी सचिव आर बी पाटील , माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील , प्राथमिक शिक्षक संघटनेचे महेंद्र रामोसे,मनोहर मगर,बापू चव्हाण, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जितेंद्र ठाकूर,जे डी अहिरे,संदीप मोरे यांनी त्यांचा सत्कार केला.

