अमळनेर:- दि ३० जुलै रोजी म्हसले येथील रहिवासी गुलाब तुकाराम पाटील (वय ६४ वर्ष) हे संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हे म्हसले बस स्टँड जवळील मुतारीत लघवी करुन परत येत असताना रोडच्या कडेला रोड ओलांडण्यासाठी उभे होते. त्यावेळी टाकरखेडा गावाकडुन धरणगावकडे येणारी तीनजण बसलेले मोटारसायकल स्वार बजाज प्लॅटिना मोटार सायकल क्र एम एच १९ डीटी ६०३६ होती तिचे वरील चालक यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव विनोद पुंजु मोरे व त्याच्या सोबत असलेले जितेद्र मगन पाटील, (दोन्ही रा. टाकरखेडा,) अमोल बाबुराव भिल (रा औरंगपुर) यांनी जोरदार धडक दिली. त्यात धरणगाव जळगाव येथे नेऊन उपचारादरम्यान त्यांचा ३१ रोजी सायंकाळी ६.१० मिनिटांनी मृत्यू झाला आहे. याबाबत मयताचा पुतण्या शरद मुरलीधर पाटील (वय ४४ वर्ष) रा. म्हसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विनोद पुंजू मोरे याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पो.हे.कॉ. संदेश पाटील हे करत आहेत