राष्ट्रवादी शरदपवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, खा.”सुप्रिया सुळे 17 रोजी अमळनेरात
अमळनेर-अमळनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडे अनेक जण इच्छुक असून पक्ष सर्व्हे करून उमेदवार देईल तसेच कोणत्याही परिस्थितीत ही जागा आम्ही जिंकणारच आहोत असा दावा राष्ट्रवादी शरदपवार पक्षाचे नुतन जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी अमळनेर येथे पत्रकार परिषदेत केला.
पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच ते अमळनेर येथे आले होते त्यांच्या सोबत जिल्हा कार्याध्यक्ष शालीग्राम मालकरही उपस्थित होते.अमळनेर येथे सुरवातीला त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत पत्रकारांना संबोधित केले.यावेळी ते म्हणाले की अमळनेर येथे आमची बैठक उत्साहात झाली असून अमळनेरची जागा राष्ट्रवादीच लढेल आणि जिंकेलही,जळगाव जिल्ह्यात आम्ही ग्रामसंवाद यात्रा काढणार असून जिल्ह्यात संपूर्ण प्रशासनावर महायुतीची विशेष करून मंत्री गिरीश महाजन यांची दहशत आहे,लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात त्यांनी बचतगटाचा वापर करून मते आपल्या पारड्यात टाकून घेतली आहेत,खरे पाहता शेतकरी व बेरोजगार या शासनावर नाराज आहेत,नारपार चे पाणी गिरणा खोऱ्यात आणण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली असताना केंद्र शासनाने रद्द केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान यांनी केले आहे,अमळनेर मतदारसंघात मंत्री अनिल पाटलांवर शेतकरी व जनता नाराज असल्याने याठिकाणी आम्ही नक्कीच जिंकू असा दावा करत राष्ट्रवादीची जळगाव जिल्ह्यात अमळनेर सह चाळीसगाव,पारोळा-एरंडोल,पाचोरा-भडगाव,जळगाव ग्रामिण ,चोपडा, मुक्ताईनगर, भुसावळ,जामनेर आदी जागांवर लढण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
तर कार्याध्यक्ष शाळीग्राम मालकर यांनी 17 ऑगस्ट रोजी खासदार सुप्रिया ताई सुळे जळगाव जिल्ह्यात येत असून अमळनेर येथे त्या मेळावा घेतील,याठिकाणी अनेक इच्छुक आहेत, लाडकी बहीण योजना ही प्रत्यक्षात फसवी बहीण योजना असून यात अनेक अटी शर्थी तर आहेतच पण किती दिवस ती चालेल याबाबत साशंकता आहे,व या योजनेचा फायदा महायुतीला मुळीच होणार नाही असेही त्यांनी सांगितले.आणि अमळनेर येथे आम्हीच जिंकू असा दावा त्यांनीही केला.
यावेळी माजी आमदार डॉ बी एस पाटील,प्रदेश सरचिटणीस सौ तिलोत्तमा पाटील,तालुकाध्यक्ष सचिन पाटील,शहराध्यक्ष श्याम पाटील,सौ रिता बाविस्कर, सौ योजना पाटील,संजय पूनाजी पाटील,अनंत निकम, आदी उपस्थित होते.