अमळनेर : काही एक कारण नसताना ताडेपुरा कंजरवाडा भागात बारा जणांनी एका महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून विनयभंग केला तर एका महिलेला काठीने मारहाण करण्यात आली.
ताडेपुरा कंजरवाडा भागातील एक महिला ८ रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घरी असताना तिच्या घरासमोर मीनाक्षी सूरज कंजर, नितीन साजन तमाईचे, सचिन साजन तमाईचे, तुषार सूरज गुमाणे, सुमनबाई नितीन तमाईचे, रोमा सचिन तमाईचे , नैना रोहित बाटुनगे, बेलाबाई कंजर , प्रिया गणेश बागडे , गब्बूबाई बागडे , नरेंद्र कोचरे गुमाणे, प्रितेश बागडे हे विचारपूस न करता आले व शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी व चापटानी मारहाण केली. मिनाक्षीने काठीने मारहाण केली. त्याचवेळी तिची चुलत सून आली असता नितीन व सचिन यांनी तिचे दोन्ही हात धरून तुषार याने डोळ्यात मिरची पूड टाकून विनयभंग केला. तसेच प्रितेश याने तिच्या गुडघ्यावर काठीने मारहाण केली. मिनाक्षीने फिर्यादी महिलेची सोन्याची चेन तोडून घेतली. अशी फिर्याद अमळनेर पोलीस स्टेशनला दिल्यावरून आरोपींविरिद्ध विनयभंग आणि दंगलीचा गुन्हा दाखल करणयात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.