हिमाचल मधील ज्वाला देवी दर्शनाचा साकारणार देखावा
अमळनेर– येथील कृषी उत्पन्न बाजार समिती गणेशोत्सव मंडळाची सभा दि.6 ऑगस्ट मंगळवार रोजी सभापती अशोक आधार पाटील यांच्या उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली.
यात अध्यक्ष पदी सुधाकर संतोष पाटील याची सर्वानुमते निवड झाली व खालील प्रमाणे पदाधिकारी निवड करण्यात आली.उपाध्यक्ष गौरव धनंजय पाटील,सेक्रेटरी प्रकाश काशिनाथ अमृतकार, सहसेक्रेटरी,योगेश गोविंदा महाजन, खजिनदार कपिल कमलशेठ दलाल ,सदस्य यतीन कोठारी, अमरदिप अमृतकार ,सतिष मराठे, महेश झवर, भरत बोथरा,महाविर बाफना, शंकर बितराई, वृषभ पारख
, मितेश गोसलिया,सदस्य प्रशांत पाटील, अमोल मराठे
,जितेंद्र राणे,योगेश येवले, रोनक पारख, प्रशांत अमृतकार ,गोविंद अग्रवाल यांची निवड करण्यात आली.
दर वर्षा प्रमाणे यंदा हि मार्केट ची परंपरा जोपासुन अगळा वेगळा देखावा हिमाचल प्रदेश मधील ज्वाला देवी दर्शन गणेश भक्तांसाठी करण्यात येणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती मंडळा कडुन करण्यात आली आहे.