
तालुक्यातील सरपंचानी प्रांताधिकारीकडे दिले निवेदन..
अमळनेर :- बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली असून ह्या घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी असे निवेदन अमळनेर तालुक्यातील सरपंच यांनी प्रांताधिकारी यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की,मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या मानवतेला काळिमा फासणारी असून राजकीय सुडातून त्यांचे अपहरण करून त्यांची मारहाण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली.ह्या हत्येमुळे राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ह्याघटनेची उच्चस्तरीय समिती गठीत करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात येण्याची मागणी सरपंच यांनी केली आहे.
निवेदनावर दामोदर खैरनार,संजीवकुमार पाटील, भैय्यासाहेब पाटील,मनीषा पाटील,केदारसिंग जाधव,पंकज निकम, सुनील पाटील आदींसह तालुक्यातील सरपंच यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.